22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रसरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा; शिंदे गटाचं राज्यपालांना पत्र

सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा; शिंदे गटाचं राज्यपालांना पत्र

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारसाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. तब्बल आठ दिवसानंतर अखेर एकनाथ शिंदे गटाने ठाकरे सरकारचा पाठिंबा काढला आहे. शिंदे गटाने तसं पत्रंच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलं आहे.

आम्ही ३९ आमदार ठाकरे सरकारचा पाठिंबा काढत आहोत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं असून सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगा, असं पत्रंच शिंदे गटानं राज्यपाल कोश्यारी यांना पाठवले आहे. त्यामुळे आता राज्यातील सत्तेच्या हालचालीचं केंद्र राजभवनावर केंद्रीत झालं आहे.

शिंदे गटाच्या या पत्रानंतर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात याकडेही सर्वच देशाचं लक्ष लागलं आहे. या राजकीय घडामोडी घडत असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानीही हालचाली वाढल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या