28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रअस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार?

अस्लम शेख यांच्या अडचणी वाढणार?

एकमत ऑनलाईन

  स्टुडिओ घोटाळा प्रकरणी पर्यावरण खात्याची नोटीस

मुंबई : मढमधील कथित स्टुडिओ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्रालयाने काँग्रेसचे नेते अस्लम शेख यांना नोटीस जारी केली आहे. त्यामुळे अस्लम शेख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. एका बाजूला देशपातळीवर काँग्रेस आक्रमक झाली असून आता शेख यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी पर्यावरण विभागाने मुंबईचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेला कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काँग्रेस नेते अस्लम शेख यांचा एक हजार कोटी रुपयांचा घोटाळा आहे. त्यापैकी ३०० कोटींची कागदपत्रं आहेत. अस्लम शेख यांनी समुद्रात स्टुडिओ उभारला आहे, असे पाच स्टुडिओ आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. यामध्ये सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन केले असून गोपाळ शेट्टी यांच्यासोबत मी पाहणी केली आहे. कागदावर ही जागा समुद्रापासून दूर दाखवली आहे. आदित्य ठाकरे यांनी पण इथे भेट दिली होती, असेही सोमय्या म्हणाले आहेत.

अस्लम शेख आणि भाटिया स्टुडिओ यांचे मालक भागीदार असल्याचे सांगितले जात आहे. मंग्रो तोडून स्टुडिओ उभारले आहेत. याला पर्यावरण विभागाने सहा महिन्यांसाठी फिल्म सेट उभारणीसाठी परवानगी दिली होती. पण अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने एक हजार कोटी रुपयांचा स्टुडिओ उभारले आहेत. असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे.

या प्रकरणात कोस्टल झोन अ‍ॅथॉरिटी यांना पत्र लिहिले आहे. यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. दरम्यान, सोमय्यांच्या आरोपानंतर अस्लम शेख यांनी अवघ्या दोन दिवसांतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. अस्लम शेख यांच्यासोबतच भाजप नेते मोहित कंबोज देखील उपस्थित होते. एकाच गाडीतून हे दोघेही फडणवीसांच्या भेटीसाठी गेले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या