22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील अस्मानी-सुलतानी कारभाराला कडक डोस मिळणार : शेलार

राज्यातील अस्मानी-सुलतानी कारभाराला कडक डोस मिळणार : शेलार

एकमत ऑनलाईन

मुंबई : उद्या म्हणजे १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपाने एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कोरोनानंतर भाजपने एवढा मोठा सोहळा करायचा योजला आहे. यासाठी हजारो कार्यकर्ते सोमय्या ग्राऊंडवर येणार असल्याची माहिती भाजपचे नेते आशिष शेलार यांनी दिली. कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात आता शेलारांनी आणखी एक ट्विट केले आहे. महाराष्ट्राच्या अवकाशात अधर्माची अहंकारी वादळे कितीही निर्माण झाली तरी या अस्मानी, सुलतानी कारभाराला ‘डोस’ मिळणार, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
यासंदर्भात त्यांनी ट्विट केले असून यात १ मेच्या सभेची माहिती देत महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

शेलार म्हणतात, ‘भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणा-या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा…’महाराष्ट्राच्या अवकाशात अधर्माची अहंकारी वादळे कितीही निर्माण झाली तरी..या अस्मानी, सुलतानी कारभाराला ‘डोस’ मिळणार! १ मे रोजी सोमय्या मैदानात बुस्टर डोस सभा, सह्याद्रीची सिंहगर्जना! जय शिवशंभू राजा!, असे म्हणत त्यांनी इशारा दिला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा होणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांना बूस्टर आणि महाविकास आघाडीला कडकडीत डोस दिला जाणार असल्याचे ते म्हणाले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या