24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयगुजरातमध्ये मंदिरात लाऊडस्पीकरवरून आरती केल्याने हत्या

गुजरातमध्ये मंदिरात लाऊडस्पीकरवरून आरती केल्याने हत्या

एकमत ऑनलाईन

मेहसाणा : गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील एका गावात मंदिरात लाऊडस्पीकर वापरून आरती करत असल्याने एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गुजरातमधील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यावरून हिंसाचार झाल्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे. मेहसाणाच्या लंघनाज पोलिसांनी सांगितले की, मृत जसवंत ठाकोर हे रोजंदारी मजूर होते. पोलिसांनी जसवंतचा मोठा भाऊ अजित याचा जबाब घेतला आणि गुरुवारी सदा ठाकोर, विष्णू ठाकोर, बाबू ठाकोर, जयंती ठाकोर, जवान ठाकोर आणि विनु ठाकोर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. जोटणा तालुक्यातील लक्ष्मीपारा गावातील मुदर्डा टेबावलो ठाकोरवास येथील रहिवासी अजित यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजता ही घटना घडली.

अजितने पोलिसांना सांगितले की, जसवंत आणि मी आमच्या घराजवळील मेलाडी माता मंदिरात आरती करत होतो. आम्ही लाऊडस्पीकरवर आरती करत होतो. तेवढ्यात सदाजी आमच्याकडे आला आणि आम्ही लाऊडस्पीकर इतक्या जोरात का वाजवत आहोत, असे विचारले. आम्ही आरती करत आहोत असे त्याला सांगितले. यावर रागावलेल्या सदाने लाऊडस्पीकर लावल्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
दोन्ही भावांनी विरोध केल्यावर सदाने त्याच्या साथीदारांना बोलावले आणि एफआयआरमधील पाच आरोपी घटनास्थळी पोहोचले. अजितने पोलिसांना सांगितले की, पाच जणांकडे काठ्या होत्या ज्याने त्यांनी आम्हा दोघांवर हल्ला केला. आमच्या १० वर्षीय पुतण्याने त्याच्या आईला फोन केला आणि त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

आजूबाजूला जमलेल्या गावक-यांनी दोन्ही भावांना मेहसाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर तेथून त्यांना अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जसवंत यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अजितच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले. यापूर्वी २ मे रोजी अहमदाबाद जिल्ह्यातील बावला तालुक्यातील ३० वर्षीय भरत राठोड याला मंदिरात लाऊडस्पीकर वाजवल्याबद्दल मारहाण करण्यात आली होती. त्या प्रकरणात आरोपी आणि पीडित ंिहंदू समाजातील दोन भिन्न जातींचे होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या