30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeउस्मानाबादघाटंग्री येथे बोगस डॉक्टर नागरिकांच्या जीवाशी खेळतोय

घाटंग्री येथे बोगस डॉक्टर नागरिकांच्या जीवाशी खेळतोय

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद (धनंजय पाटील): जिल्ह्यात कोरोना विषाणूने शहरी भागासह ग्रामीण भागात थैमान घातले असून अशा भितीच्या काळात घाटंग्री ता. उस्मानाबाद येथे पश्चिम बंगाल येथील एका बोगस डॉक्टरने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आहे. घाटंग्री येथील एका खासगी महिला डॉक्टरने या बोगस डॉक्टरवर कारवाई करावी म्हणून जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामपंचायत, पोलिस पाटील आदींना अनेकवेळा लेखी तक्रार देऊनही संबंधित बोगस डॉक्टरवर कठोर कारवाई झाली नाही.

तक्रारी देऊनही काहीच कारवाई होत नसल्याने या बोगस डॉक्टरचे मनोधैर्य वाढले असून तो बिनधास्तपणे घाटंग्री गावातील भोळ्या-भाबड्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ऐवळे व पोहनेर आरोग्य केंद्राचे डॉ. पवार, घाटंग्री आरोग्य उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. लामकाने हे या बोगस डॉक्टरच्या व्यवसायाकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

घाटंग्री हे जवळपास ८ हजार लोकसंख्येचे गाव उस्मानाबाद शहरालगत असून गावात सुशिक्षित व शासकीय नोकरदारांची संख्या ब-यापैकी असली तरी नोकरदार वर्ग उस्मानाबाद शहरात स्थायिक झाला आहे. उर्वरित लोकसंख्या गरिब, कष्टकरी, अज्ञानी, भोळी-भाबडी व शेतीत, उसतोडीचे काम करणारी आहे. गावात जिल्हा परिषदेचे आरोग्य उपकेंद्र (आरोग्यवर्धिनी उपकेंद्र) व एका बीएचएसएस वैद्यकीय पदवी असलेल्या महिला डॉक्टरचे क्लिनिक आहे. त्या डॉक्टर महिलेचे पती फार्मासिस्ट असून त्यांचे क्लिनिक शेजारी मेडीकल दुकान आहे.

गावात शासकीय व खाजगी असे दोन दवाखाने असताना गावात आश्रमशाळेच्या जवळ पश्चिम बंगाल येथील मिल्टन बिश्वास नावाच्या एका भामट्या बोगस डॉक्टरने दवाखाना थाटला आहे. घाटंग्री गावातील भोळी-भाबडी व गरीब जनता या बोगस डॉक्टरच्या उपचाराला बळी पडत आहे. एक बोगस डॉक्टर नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याने गावातील महिला डॉक्टरने ग्रामपंचायतपासून जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत सर्वांकडे त्याच्या तक्रारी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. जिल्हा आरोग्य अधिका-यांनी तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने उस्मानाबादचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत ऐवळे यांना घाटंग्री येथील बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले असतानाही आजपर्यंत त्याच्या कारवाई झालेली नाही.

पोहनेर आरोग्य केंद्राचे डॉ. पवार, घाटंग्री उपकेंद्राचे डॉ. लामकाने हे तर गावात बोगस डॉक्टर नसल्याचे छातीठोकपणे सांगतात. त्या बोगस डॉक्टरला बहुतांश अज्ञानी नागरिकांचा पाqठबा असून ग्रामपंचायतीनेही कधी त्या डॉक्टरविरोधात वरिष्ठाकडे अहवाल दिलेला नाही. त्यामुळे गावातील नागरिकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन बोगस डॉक्टरचा धंदा तेजीत व बिनबोभाटपणे सुरू आहे.

बुधवारी दि. २३ रोजी सकाळी एकमतच्या वतीने घाटंग्री गावात जाऊन त्या बोगस डॉक्टरचे स्टिंग ऑपरेशन केले. एकमतचे कर्मचारी रुग्ण होऊन त्या बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात गेले. मिल्टन बिश्वास या भामट्याने रुग्णाकडे काय त्रास होत असल्याची विचारणा केली, थंडी वाजत आहे, पोटात रात्रभर दुखत आहे, संडास लागली आहे, असे सांगितले. त्याने पोटाला बादून विचारपूस केली व शंभर रुपये फिस घेऊन वेगवेगळ्या पाच प्रकारच्या गोळ्या त्याच्या जवळ असलेल्या दिल्या.

त्याच वेळी गावातील एका महिलेला सलाईन लावलेले होते. तीन पेशंट तपासणीसाठी वेटींगमध्ये होते. त्याच्या दवाखान्यावर कसलाही बोर्ड नाही. तो घाटंग्रीसह अंबेव्होळ, खताळवाडी, कौडगाव, परिसरातील लमाणतंडे या गावात जाऊन फिरती सेवा देत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे २०१० मध्ये जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम व जिपचे अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार कार्यरत असताना जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची शोधमोहिम घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी या मिल्टन बिश्वास याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जोरदार पावसामुळे शेतक-यांच्या खरीप पिकांचे नुकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या