23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रपुण्यात शिवसेनेच्या माजी आमदारासह ८ पोलिसांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

पुण्यात शिवसेनेच्या माजी आमदारासह ८ पोलिसांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

पुणे : शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर आणि कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जगन्नाथ लोणकर यांच्यासह आठ पोलिस कर्मचा-यांवर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका मासे विक्रेत्याला दुकान बंद करण्यासाठी दबाव टाकत बाबर यांनी दादागिरी करत पोलिसांच्या मदतीने मारहाण केली होती. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला.

माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नारायण लोणकर, अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, पोलीस कर्मचारी कामथे, गरुड, नदाफ, सुब्बानवाड, सुरेखा बडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका मासे विक्रेत्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने हे गुन्हा दाखल करण्यात आले.

याबाबत पालिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’च्या दिवशी मासे विक्रीचे दुकान बंद कर, असं म्हणत माजी आमदार बाबर यांनी एका मासेविक्रेत्याला शिवीगाळ करत दमदाटी केली होती. त्यावेळी संबंधित मासेविक्रेता हा दाद मागण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र त्यावेळी पोलीस निरीक्षक आणि कर्मचा-यांनी त्याला मारहाण केली होती. त्यानंतर आपल्याला न्याय मिळावा म्हणून सदर मासेविक्रेत्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या