नगर : भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या पक्षप्रवक्त्या नूपुर शर्मा यांचे समर्थन करणा-या व्यक्तींवर हल्ल्याची मालिका सुरूच आहे. नगर जिल्ह्यातही एका युवकाने शर्मा यांचे समर्थन केल्याने त्याच्यावर हल्ला झाला.
या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. प्रतिक पवार नावाचा युवक गुरुवारी रात्री मित्र अमित माने याच्यासोबत दुचाकीवरून जात असताना कर्जतमध्ये त्याच्यावर हल्ला झाला.