बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे. सर्व राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरु आहे. दरम्यान, शुक्रवारी तुमकूरमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे उमेदवार आणि माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वरा हे कर्नाटकातील चिकनायकनहल्ली तालुक्यात प्रचाराला गेले असता यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आली. सध्या त्यांना रुग्णालयात रेफर करण्यात आले.
प्रचारादरम्यान कामगार डॉ. जी. परमेश्वरा याना उचलून नाचत होते. त्याच वेळी अज्ञातांनी दगडफेक केली. जखमी काँग्रेस नेत्यावर अक्कीरामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि नंतर तुमकूर येथील सिद्धार्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रेफर करण्यात आले.
कर्नाटकात २२४ सदस्यीय विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील निवडणुकीचा निकाल १३ मे रोजी लागणार आहे.