टोकियो : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा हे पश्चिम जपानच्या एका बंदराला भेट देण्यासाठी आले असता त्यांच्यावर गॅस किंवा पाईप बॉम्ब फेकण्यात आले. ते वाकायामा दौऱ्यावर असताना मोठा स्फोट झाला. त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच हा हल्ला झाला. ते या हल्ल्यातून सुखरूप रित्या बचावले आहेत. सुरक्षा रक्षकांनी हल्लेखोराला पकडले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाकडून या घटनेला तात्काळ अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेबाबत स्थानिक पोलिसांनी सध्या काहीही बोलण्यास नकार दिला आहे. जपानमधील राष्ट्रीय चॅनल ने घटनास्थळावरून एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे फुटेज देखील दाखवले आहे.
जुलै २०२२ मध्ये माजी पंतप्रधान शिंजो आबे एका कार्यक्रमात भाषण देत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर जपानमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.