21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्र  सत्तेसाठी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न

  सत्तेसाठी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

नागपूर : बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यात शिवसेना रुजवली. राज्यात पक्षविस्तारासाठी बाळासाहेब ठाकरे यांनीच भाजपला आधार दिला. मात्र, आता सत्तेसाठी भाजप त्यांचीच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना केली.

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत महाविकास आघाडीकडूनही राज्यपालांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, निवडणुकीच्या पद्धतीबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक घेण्याचे निर्देश देता येत नाही, असे उत्तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाविकास आघाडीला दिले होते. मग, राज्यपालांनी आता कोणत्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला निवडणूक घेण्याचे आदेश दिले, असा प्रश्न नाना पटोले यांनी केला.

तसेच, महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी एकच अर्ज दाखल करु किंवा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

लोकशाहीची रोज हत्या
लोकशाही जिवंत ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून लोकशाहीची रोज हत्या होत आहे. यासाठी भाजप नेतृत्व सर्व संवैधानिक संस्थांचा बेकायदा वापर करत आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा असल्याची टीका नाना पटोले यांनी केले.

विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे?
ज्या पक्षाकडे जास्त आमदार असतील त्याच पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद जाईल, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. मविआमध्ये सध्या शिवसेनेकडे सर्वाधिक ६६ आमदार आहेत. मात्र, बंडखोरीमुळे त्यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद जाऊ शकते.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरआक्षेप

राज्यात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि बहुमत चाचणीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. पण यांपैकी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर आता काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना हा कार्यक्रम मांडलाच कसा? असा सवाल करताना काँग्रेसनं विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार आहोत. गरज पडल्यास आम्ही तीन अर्जही दाखल करु. पण याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. पण अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत परिस्थिती स्पष्ट होईल

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या