अमरावती : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मागील काही दिवसांपासून सातत्याने विरोध होत आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे कोश्यारी यांच्या कार्यक्रमांना विरोध होत आहे. शिवाय कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलने होत आहेत. त्यातच शनिवार दि. २४ डिसेंबर रोजी अमरावती येथे कोश्यारी यांना जोडे दाखविण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून करण्यात आला.
अमरावती येथे राज्यपाल कोश्यारी आले असता ठाकरे गटाकडून राज्यपालांना जोडे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांना जोडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. तसेच कार्यकर्त्यांनी राज्यपाल विरोधी घोषणा दिल्या. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
राज्यपाल अमरावती दौ-यावर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आज अमरावती दौ-यावर आहेत. सीमालगतच्या गावांमधील समस्यांच्या पार्श्वभूमीवर हे दौरे आहेत. मात्र त्याआधीच अमरावतीत निषेध आंदोलन सुरू झाले. राज्यपालांच्या बैठकीच्या काही अंतरावर आंदोलन झाले. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.