27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रविरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; शौमिका महाडिकांचा सभात्याग

विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न; शौमिका महाडिकांचा सभात्याग

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर: आमचे माईक बंद करण्यात आलेले आहेत. आम्हाला बोलूही दिले जात नाही. आम्हाला आणि आमच्या ठरावधारकांना बसायला जागाही नाही. विरोधकांचा असाच आवाज दाबायचा होता तर कशाला बोलावली गोकुळची वार्षिक सभा बोलावली, असा सवाल करत महाडिक गटाच्या नेत्या शौमिका महाडिक आणि त्यांच्या संचालकांनी गोकुळच्या वार्षिक सभेवर बहिष्कार टाकत बाहेर पडल्या.

गोकुळच्या कारभारावरून गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, विरोधकांनी समांतर सभा घेण्याचा दिलेला इशारा, सभा चालविण्याचा सत्ताधा-यांनी केलेला निश्चय यामुळे गोकुळची ६० वी सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सभागृहात प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.

सभा सुरू होण्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बसण्याच्या खुर्च्यावरून जुंपली होती. आमच्या ठरावधारकाला बसायला जागा नसेल तर मीही व्यासापीठावर जाणार नाही, मीही उभी राहूनच प्रश्न विचारेन, अशी भूमिका महाडिक गटाच्या नेत्या शौमिका महाडिक यांनी घेतली होती. दुपारी दोनपर्यंत त्यांनी उभे राहूनच सत्ताधा-यांना प्रश्न विचारले. मात्र, माईक बंद आहेत, आम्हाला बोलू दिले जात नाही, असे सांगून त्यांनी सभात्याग केला.

सत्ताधारी मंडळी हातवारे करून विषय मंजूर करा, असे सांगत होते. आमच्या संचालकांना बोलू दिले जात नव्हते. तेथे सर्वसामान्य सभासदांचे काय होत असेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी मंडळींनी दिलेल्या आकडेवारी पर्दाफाश करण्यात येईल, असेही शौमिका महाडिक यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या