19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeपरभणीमुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरणाचा प्रयत्न

मुलीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून अपहरणाचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

परभणी : अल्पवयीन मुलीस भेटण्यास बोलावून वाईट उद्देशाने हात धरून त्या मुलीस कारमध्ये बळजबरी बसण्यास सांगितल्याची घटना जिंतूर येथे घडली. यावेळी मुलीने आरडाओरड केल्याने लोक जमा होताच संबंधित तरुणांनी त्या ठिकाणाहून कारमधून पळ काढला. या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून जिंतूर तालुक्यातील कोक येथील सय्यद साद पीसय्यद रहीम व सरपंच वहिद पठाण या दोघा आरोपीविरूध्द जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीने जिंतूर पोलिसांत तक्रार दिली असून यात म्हटले आहे की, आपण कोक येथील रहिवाशी असून बोरी येथील मोहमंद इकबाल ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. जून २०२१ पासून कोक येथे राहणारा सय्यद साद पिÞसय्यद रहीम हा कॉलेजला जात असताना मागे येत होता व माझ्याकडे बघायचा. तसेच जबरदस्तीने फोन करण्यास सांगत होता. त्यातूनच त्याने आता जबरदस्तीने कारमध्ये बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या