24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रऔरंगाबाद खंडपीठाचा अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका; नोटीसही बजावली

औरंगाबाद खंडपीठाचा अब्दुल सत्तारांना पुन्हा झटका; नोटीसही बजावली

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद खंडपीठाने पुन्हा एकदा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना झटका दिला आहे. राज्य महसूल मंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी दिलेल्या एका आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बाजार समितीच्या जागेचे व्यवहार प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर न्यायालयानेही व्यवहाराला मान्यता दिली असताना देखील तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका अर्जावर या व्यवहाराला स्थगिती दिली होती. तर याचवेळी त्यांनी बाजार समितीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

या आदेशाच्या विरोधात संबंधित लोक न्यायालयात गेले असता न्यायालयाने अब्दुल सत्तारांच्या आदेशाला स्थगिती देत भूखंडावरील स्थगिती उठवली आहे.
कृउबा समितीच्या मालकीच्या सर्व्हे नं. ९२३३ येथील जागेच्या व्यवहारासंदर्भात डॉ. दिलावर मिर्झा बेग यांनी तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे एक तक्रार अर्ज केला होता. त्यावर मंत्रालयातील संबंधित कक्ष अधिका-याने चौकशीचे आणि प्रशासक मंडळ आणि संबंधित अधिका-यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. चौकशीसाठी एक समितीदेखील गठित करण्यात आली होती. या आदेशाविरुद्ध तत्कालीन मुख्य प्रशासक जगन्नाथ काळे आणि इतरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

अब्दुल सत्तार यांना बजावली नोटीस
यावर आदेश देताना खंडपीठाने तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या निर्देशाने कृउबा समितीच्या जिन्सी येथील जागेबाबत झालेल्या व्यवहाराच्या चौकशीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह डॉ. दिलावर बेग यांनाही नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्यामुळे या प्रकरणात अब्दुल सत्तार यांनी कोणताही हस्तक्षेप करू नये, असे आदेश कोर्टाने दिले आहेत.

सीलबंद अहवाल सादर करा
डॉ. दिलावर मिर्झा बेग यांनी औरंगाबाद बाजार समितीच्या जिन्सी येथील जागेच्या व्यवहारांबाबत विद्यमान कृषी आणि तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे किती तक्रार अर्ज केले, याची चौकशी करून त्याचा सीलबंद अहवाल दाखल करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्या. अरुण पेडणेकर यांनी दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या