26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादची फेमस यूट्यूबर बिंदास काव्या बेपत्ता

औरंगाबादची फेमस यूट्यूबर बिंदास काव्या बेपत्ता

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली आहे. २४ तास उलटले तरी शोध लागेना. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध यूट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली आहे.

मित्र-कुटुंबियांकडे तिची विचारपूस केली असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही. बिंदास काव्या कमी वयात यूट्यूबवर चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. शुक्रवारी ती घरी परतली नसल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केली पण तिचा काहीच पत्ता लागला नाही. अखेरीस पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पण, पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. आपल्या मुलीचा लवकरात लवकर शोध लागावा अशी विनंती तिच्या पालकांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

बिंदास काव्याचे ४३ लाख ३० हजार फॉलोअर्स आहेत. इतकेच नव्हे तर तिच्या व्हीडीओला लाखापेक्षा अधिक व् ूज आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या