22 C
Latur
Wednesday, February 8, 2023
Homeऔरंगाबादऔरंगाबादच्या शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग

औरंगाबादच्या शहागंज कपडा मार्केटमध्ये भीषण आग

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या शहागंज परिसरात कपडा मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या आहेत. तर घटनास्थळी पोलीसही दाखल झाले असून, अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारच्या सुमारास शहागंज परिसरात असलेल्या न्यु फॅशन होलसेल कापड दुकानाच्या तिस-या मजल्यावरील गोडाऊनला आग लागली. पाहता पाहता आगीचा भडका उडाला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले. घटनास्थळी औरंगाबाद महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे सात बंब दाखल झाले आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आग मोठ्या प्रमाणावर पसरली असल्याने अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागत आहे. सुदैवाने यात कोणतंही जीवितहानी झालेली नाही, मात्र आग आणखी भडकण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या शहागंज परिसरात कपडा मार्केट आहे. आजूबाजूला मोठमोठी कापडाची होलसेल दुकान आहेत. जिल्हाभरातून नागरिक खरेदीसाठी या ठिकाणी येत असतात. दरम्यान, आज दुपारी आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आजूबाजूच्या दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या अग्निशमन दल आगी विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न सुरु आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या