22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयबाबा राम रहिमसह ५ दोषींना हत्येप्रकरणी आजन्म कारावास

बाबा राम रहिमसह ५ दोषींना हत्येप्रकरणी आजन्म कारावास

एकमत ऑनलाईन

चंदीगड : न्यायालयाने सोमवार दि. १८ ऑक्टोबर रोजी डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राम रहिम सेवादार रणजितसिंह याच्या हत्येप्रकरणी दोषी ठरले होते. त्यानंतर आज त्यांना शिक्षा सुनावण्यात आली. बाबा राम रहिम यांच्याबरोबरच त्यांच्या इतर पाच साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने राम रहीम यांना ३१ लाख तर इतर चार आरोपींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमीत राम रहीम यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इतर चार आरोपींना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम आणि त्यांच्या सहका-यांना न्यायालयात ८ ऑक्टोबरलाच दोषी ठरवण्यात आले होते. पण न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज निकालाचे वाचन न्यायालयाकडून करण्यात आले. त्याआधी हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच जिल्ह्यात कमल १४४ लागू करण्यात आले आहे. आपल्या दोन अनुयांयीवर बलात्कार केल्याच्या आरोपांखाली राम रहीम सध्या २० वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगत आहे. त्याच्यावर अनेक आरोप आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या