16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमहाराष्ट्र‘बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक

‘बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक

एकमत ऑनलाईन

सांगोला: शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले अशी टीका करताना यावेळी त्यांनी आक्षेपार्ह भाषाही वापरली. ‘सायकल चोरणारे नारायण राणे मंत्री झाले. स्वार्थासाठी लोक आपला बाप बदलतात,’ असे वक्तव्य त्यांनी केले सांगोला तालुक्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

गुलाबराव पाटील यांनी यावेळी ईडीच्या कारवाईंवरुनही टीका केली. ‘आमची सत्ता व्यवस्थित आहे म्हणूनच ५० हजारांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला की ईडीची चौकशी लावली जात आहे,’ असा आरोप त्यांनी केला. ‘आम्हाला जेल नवी नाही, बॅचलर ऑफ जेल म्हणजे शिवसैनिक आहे एवढे लक्षात ठेवा. बोकडाला मरण ही परमेश्वर ठरवतो मग आमचे मरण ईडी ठरवणार आहे का?,’ असा सवालही यावेळी त्यांनी केला.

गुलाबराव पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कौतुक करत असताना त्यांना विना लायसन्सचा ड्रायव्हर म्हणले. ‘‘कोणतीही गाडी चालवायची असेल तर लायसन्स लागते. किंवा कोणतेही काम करण्यासाठी त्यासाठी तुम्ही पात्र असल्याचे प्रमाणपत्र लागते. मात्र, सरकार चालवण्यासाठी शरद पवारांनी विना परवान्याचा चालक बसवला. उद्धव ठाकरे चालक, अजितदादा कंडक्टर, बाळासाहेब थोरात प्रवासी….ड्रायव्हर अ‍ॅक्सिडंट करेल असे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटले. ज्याने आयुष्यात गाडी चालवली नाही त्याला थेट बसवले. मात्र, कितीही संकटे आली तरी दोन वर्षे झाले तरी आमची तीन लोकांची गाडी सुसाट चालली आहे,’’ असे ते म्हणाले. गुलाबराव पाटील यांनी यावेळी सरकार पाच वर्ष टीकेल असा विश्वास व्यक्त केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या