25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रसुषमा अंधारे निष्ठा शिकवत असतील तर दुर्दैव

सुषमा अंधारे निष्ठा शिकवत असतील तर दुर्दैव

एकमत ऑनलाईन

सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांचा दसरा मेळावा दणक्यात पार पडला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदेंनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. मात्र, या सगळ्यात शिवतीर्थावरील ठाकरेंच्या मेळाव्यात शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी चांगलेच मैदान गाजवले. अंधारेंच्या टीकेनंतर शिंदे गटातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अंधारेच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सुषमा अंधारे या एक महिन्यापूर्वी शिवसेनेत आल्या आणि उपनेत्या झाल्या. आता त्या आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना निष्ठा शिकवत असतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. उद्धव ठाकरेंबरोबर आता कोणीही राहिलेले नाही. त्यामुळे आता जो पक्षात येईल, त्याला पद मिळत आहे, जो येईल त्याला थेट ‘मातोश्री’वर प्रवेश मिळतो आहे, असे प्रत्युत्तर देसाईंनी दिले.

सुषमा अंधारेंनी वाटेल तसा प्रचार करावा. मात्र, लोकांना जो योग्य वाटेल त्यांनाचा पाठिंबा मिळेल, असा घणाघातही त्यांनी अंधारेंवर केला. दरम्यान, शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. शिंदे गटातील नेत्यांना हिंदुत्वाचे काहीही सोयरसुतक नसून त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांची काळजी नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. या टीकेला शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या