Tuesday, September 26, 2023

बद्रीनाथ मंदिर उघडले

बद्रीनाथ : चारधाम यात्रेतील बद्रीनाथ धाम आज म्हणजे १५ मे रोजी उघडले गेले असून पहाटे साडेचार वाजता वैदिक मंत्रोच्चारण करून मंदिरचे दरवाजे उघडले गेले. सकाळी नऊ वाजता बद्रीनाथाची पहिली पूजा केली.  यंदा करोना साथीचा परिणाम बद्रीनाथ यात्रेवरही झाला आहे. त्यामुळे दरवर्षी मंदिर दरवाजे उघडण्याच्या कार्यक्रमात अनेक भाविक सहभागी होतात ते यावेळी होऊ शकले नाहीत. अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्य पुजारी रावळ, धर्माधिकारी भुवनचंद्र उनियाल, राजगुरू यांच्यासह २८ लोक हजर होते. सर्वानी मास्क लावून आणि सोशल डीस्टन्सिंगचे पालन करून हा विधी पार पाडला. त्यापूर्वी सर्व मंदिर सॅनीटाइज केले गेले होते.

Read More  अमेरिका-चीनमधील तणाव वाढला

आजच्या दिवशी बद्रीनाथाचे दर्शन वेगळेच असते. मंदिर बंद होताना आणि पुन्हा उघडतानाच फक्त बद्रीनाथाचे हे रूप भाविक पाहू शकतात. यावेळी पूजा, अर्चना नसते त्यामुळे बद्रीचे मुळ रूप पाहता येते तसेच चार महिने अखंड तेवत असलेल्या नंदादिपाचेही दर्शन होते..

आज बद्रीनाथाचे मंदिर पूर्ण दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार असून नैवेद्य दाखविण्याच्या वेळी ही भाविकांना दर्शन होणार आहे. अन्य वेळी नैवेद्य दाखविताना दुपारी तीन तास मंदिर बंद केले जाते.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या