पुणे : पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर पुण्यात शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडेसह तीन जणांना पुण्याच्या सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे.
तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंडवडमध्ये ही शाईफेकीची घटना घडली होती. महापुरुषांविरोधात विधान केल्यानं चंद्रकांत पाटील यांना या घटनेला सामोरं जावं लागलं होतं.
चंद्रकांत पाटलांवरील शाईफेक प्रकरणानंतर प्रमुख आरोपी मनोज गरबडे याच्यासह तिघांवर विविध गुन्हे चिंचवड पोलिसांनी दाखल केले होते. यामध्ये सदोष मनुष्यवधाचं कलम ३०७ ही मनोजवर लावण्यात आलं होतं. तसेच विनापरवाना आंदोलन केल्याचं कलमही त्याच्यावर लावण्यात आलं होतं. यांपैकी कलम ३०७ लावण्यावरुन बराच गदारोळ झाल्यानं काल पोलिसांनी हे कलम मागे घेतलं होतं.