36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रमाजी सैनिकांसाठी 'बाळासाहेब ठाकरे सन्मान योजना' !

माजी सैनिकांसाठी ‘बाळासाहेब ठाकरे सन्मान योजना’ !

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.२९ (प्रतिनिधी) राज्यात कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफी देण्यात येणार असून या योजनेस ‘मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना’ असे नाव देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

संरक्षण दलातील शौर्यपदक धारक आणि माजी सैनिकांच्या विधवांना नागरी भागातील घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची तरतूद नगर विकास विभागाने केली आहे. ग्रामविकास विभागाने देखील ग्रामीण भागातील अशा माजी सैनिकांच्या विधवांना एकच निवासी इमारतीस करातून माफी देण्याची तरतूद केली आहे. मात्र, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सर्वच सैनिकांना मालमत्ता करातून सवलत देण्याची तरतूद नसल्याने अशी मागणी करण्यात येत होती. या दोन्ही विभागांच्या योजनांचे एकत्रिकरण करून त्याला मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्यात आले असून यामुळे नागरी व ग्रामीण भागातील माजी सैनिकांना मालमत्ता करातून देखील सूट दिली जाणार आहे.

शिवभोजन थाळी मार्चपर्यंत ५ रुपयांमध्ये !
शिवभोजन थाळीचा दर ३१ मार्चपर्यंत ५ रुपये एवढा कायम ठेवण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्यात जानेवारीपासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली असून १० रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती. कोरोनामुळे मार्च पासून या थाळीची किंमत ५ रुपये करण्यात आली. अजूनही कोरोनाचे संकट दूर झालेले नसल्याने पुढील ६ महिन्यासाठी हा दर कायम ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. सध्या एकूण ९०६ शिवभोजन केंद्रांमधून थाळ्यांचे वितरण होते. ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत सुमारे २ कोटी थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत.

नांदेड मध्ये एकासंशयीतास अटक; खा. संजय जाधव यांना जिवे मारण्याचा कट प्रकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या