22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब आमच्या पाठीशी ; स्मृतिस्थळाला भेट दिल्यावर मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

बाळासाहेब आमच्या पाठीशी ; स्मृतिस्थळाला भेट दिल्यावर मुख्यमंत्री शिंदेंचा विश्वास

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केले. तसेच बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच ही संधी मिळाली आहे. त्यांच्या आशीर्वादाने आम्ही त्यांचे विचार राज्यात पुढे नेतोय, असे प्रतिपादनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच आपल्याला ही संधी मिळाली आणि या सगळ्या घडामोडी शक्य झाल्या. त्यांचे विचार मी आणि माझ्यासोबतचे आमदार पुढे नेतील. राज्यात मराठी माणसाला, हिंदुत्वाला ताठ मानेने जगण्याची शिकवण त्यांनी दिली.

शिंदे पुढे म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही चालत आहोत. आम्ही राज्याचा सर्वांगीण विकास करू. सर्व समाजघटकांचा उत्कर्ष, विकास हेच आमचे ध्येय असेल. म्हणूनच त्यांना वंदन करून आम्ही आशीर्वाद घेतले आहेत. बाळासाहेब आमच्या पाठीशी आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या