अहमदनगर : शेतकरी संकटात असताना सरकारने त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असते. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देर्णाया सरकारचे शेतर्कयांकडे दुर्लक्ष झालं आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. आजारपणातून सावरुन थोरात यांनी सरकाविरोधात ‘एल्गार’ पुकारल आहे.
संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन झाले. आजारपणानंतर थोरात प्रथमच थेट रस्त्यावरील आंदोलनात सहभागी झाले होते.
a भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सरकारने शेतक-यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतक-यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशी मागणी थोरात यांनी केली.