37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeमहाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, चंदीगड, तामिळनाडू आणि बिहार इथे बंदी कायम?

महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, चंदीगड, तामिळनाडू आणि बिहार इथे बंदी कायम?

एकमत ऑनलाईन

जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारताच्या सात राज्यांत लॉकडाऊनलासूट न देण्याचा सल्ला

नवी दिल्ली, 23 मे : देशात कोरोनाव्हायरस धोका दिवसेंदिवस वाढत आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णांच्या आकड्यांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शुक्रवारी देशात प्रथमच कोरोनाची 6654 नवीन प्रकरणं उघडकीस आली. नवीन कोरोना प्रकरणं येताच, देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढून 1,25,101 झाली आहे. शुक्रवारी कोव्हिड-19 मुळे (Covid-19)137 लोकांचा मृत्यू झाला. देशातील कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 3,720 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोना विषाणूचं वाढतं प्रमाण लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारताच्या सात राज्यांत लॉकडाऊनलासूट न देण्याचा सल्ला दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तेलंगणा, चंदीगड, तामिळनाडू आणि बिहार इथे बंदी कायम ठेवण्याची गरज आहे. कारण गेल्या दोन आठवड्यांत कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. ज्या राज्यात कोरोना संक्रमित 5 टक्क्यांहून अधिक रुग्ण आहेत, तेथे लॉकडाउन काटेकोरपणे सुरू ठेवावं, असा सल्ला WHOकडून देण्यात आला आहे.

Read More  शासनाच्या आदेशाचे पालन करणे खासगी रुग्णालयांना बंधनकारक – आरोग्यमंत्री

जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानं केलेल्या अभ्यासात असं आढळलं आहे की, अमेरिकेतील 50 टक्के राज्यांमध्ये लॉकडाऊनच काढलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे भारतातील 34 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश 21 टक्के या वर्गवारीत येतात. गेल्या 7 मे च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात 18%, गुजरातमध्ये 9%, दिल्लीत 7%, तेलंगणामध्ये 7%, चंडीगडमध्ये 6%, तामिळनाडूमध्ये 5% आणि बिहारमध्ये 5% कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही सर्व राज्ये डब्ल्यूएचओ अंदाजापेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहेत.खरंतर, डब्ल्यूएचओचा सल्ला संपूर्ण राज्यात लागू होत नाही. कारण, राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. राज्यांच्या हॉटस्पॉट भागात लॉकडाऊनची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाऊ शकते. लॉकडाऊनमध्ये आराम मिळाला असला तरी डब्ल्यूएचओने असे संकेत दिले आहेत की, जेथे संक्रमण अधिक पसरतं आहेत तिथे फक्त लॉकडाऊननेचे ते कमी करता येईल.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या