27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयतादूंळ निर्यातीवर लवकरच बंदी?

तादूंळ निर्यातीवर लवकरच बंदी?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गहू व साखरेच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर मोदी सरकारचे तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घालू शकते. भारताने तांदूळ निर्यातीवर बंदी घातली तर जागतिक अन्न सुरक्षेवर घातक परिणाम होऊ शकतो. कारण, भारताची गणना जगातील सर्वोच्च तांदूळ उत्पादकांमध्ये केली जाते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भारताने गहू आणि साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी जागतिक बाजारपेठेला धक्का देण्यापेक्षा कमी नाही.

रशिया आणि युक्रेन युद्धात अडकले असताना भारतातून गहू आणि साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देशांमध्ये अन्न पुरवठ्याचे संकट निर्माण झाले आहे. सरकारने आधीच गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार केला जाऊ शकतो. अशा निर्बंधांमुळे देशातील खाद्यपदार्थांच्या किमती कमी होतील की नाही हे पाहण्याचे आव्हान असेल आणि तसे असेल तर कोणत्या कालावधीत, असे येस बँक लिमिटेडच्या अर्थतज्ज्ञ राधिका पिपलानी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

तांदळाचा पुरेसा साठा
भारताने पुरेशा प्रमाणात तांदळाचा साठा केला आहे. त्यामुळे भाव नियंत्रणात आहेत. तांदूळ आणि गहू भारतीय आहारात अधिक योगदान देतात. याशिवाय सरकारची अन्नधान्य रेशन व्यवस्था देखील यावर अवलंबून आहे. सरकारच्या अन्न साहाय्य कार्यक्रमासाठी गव्हाची राज्य खरेदी मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी असणे अपेक्षित आहे. त्यानंतर आणखी तांदूळ वितरित करण्याचा सरकारचा विचार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या