31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeपरभणीबँडला परवानगी नाकारली, २ युवकांचा आत्महत्येचा प्रयत्न

बँडला परवानगी नाकारली, २ युवकांचा आत्महत्येचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

एका युवकाची प्रकृती गंभीर, मानवतमधील धक्कादायक घटना
मानवत : रामनवमी शोभायात्रेत पोलिस प्रशासनाने सिंगर बँडला परवानगी नाकारल्याने मानवत येथील दोन युवकांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यापैकी एका युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.

रामनवमीनिमित्त मानवत येथे गुरुवार, दि. ३० रोजी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मिरवणुकीस प्रारंभ होणार होता. परंतु डीजेला परवानगी नाही, असे सांगून पोलिस प्रशासनाने सिंगर बँड पथकास वाजवण्यास प्रतिबंध केला. यामुळे शोभायात्रा सहा वाजता निघाली. सिंगर बँडला प्रतिबंध केल्यामुळे जमलेल्या युवकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. यातील युवक शुभम अप्पाराव दहे (२३), शिवप्रसाद बिडवे (२२) दोन्ही रा. मानवत यांनी विषारी औषध प्राशन केले. उपस्थितानी दोन्ही युवकास उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु युवकाची परिस्थिती गंभीर असल्याने त्याना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले आहे. त्यानंतर संतप्त नातेवाईक मानवत पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले व ठिय्या मांडला.

पोलिस निरीक्षकांच्या
दबावामुळे घटना
शोभयात्रेत सिंगर बँड आणला असताना पोलिस निरीक्षक यांनी माझ्या मुलाला अरेरावी केली. माझे कोणीही काही वाकडे करू शकत नाही. तुला काय करायचे ते कर असे सांगितले. त्यामुळेच माझ्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. माझ्या मुलास काही झाले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस निरीक्षक रमेश स्वामी यांची असेल, असे विजयमाला दहे यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या