21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeहिंगोली‘बांगर यांनी माझ्या कानशिलात मारून दाखवावे!’; पौळ यांनी स्वीकारले आव्हान

‘बांगर यांनी माझ्या कानशिलात मारून दाखवावे!’; पौळ यांनी स्वीकारले आव्हान

एकमत ऑनलाईन

हिंगोली : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवाय ते अधिक आक्रमकही झाले असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून समोर येत आहे.

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांना त्यांनी गद्दारच नव्हे तर शिव्या-शापही दिले होते. शिवसेनेशी कट्टर असलेले बांगर मात्र, बहुमताच्या दिवशी शिंदे गटात सहभागी झाले होते. आता शिंदे गटात सहभागी झालेल्या प्रत्येक आमदाराला गद्दार म्हणण्याचा जणूकाही ट्रेंडच सुरू झाला आहे.

बांगर यांना मात्र ‘गद्दार’ हा शब्द झोंबला असून जो कोणी गद्दार म्हणेल त्याच्या कानशिलात मारा असा सल्लाच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मात्र, त्यांचे आवाहन सेना सोशल मीडियाच्या समन्वयक अयोध्या पौळ यांनीच स्वीकारले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होत आहे. एक वेळ नाही तर लाखवेळेस आपण त्यांना गद्दारच म्हणणार असेही पौळ म्हणाल्या आहेत.

काय म्हणाले होते आ. संतोष बांगर?
संतोष बांगर हे शिंदे गटात सहभागी झाल्यापासून त्यांच्यावर टीकेची झोड उडत आहे. विशेषत: सोशल मीडियावर ‘गद्दार’ अशा कमेंटचा वर्षाव होत आहे. मात्र, आपण गद्दार नाहीतर बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक असल्याचे बांगर यांनी स्पष्ट केले होते.

शिवाय खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाची असेही ठणाकावून सांगितले होते. शिंदे गटात सहभागी झालेल्या बांगरांना एकनाथ शिंदे यांनीच जिल्हाप्रमुखपद बहाल केले आहे. त्यानंतर मतदारसंघात येताच आता कोणी गद्दार असा उल्लेख केला तर त्यांच्या कानशिलात लावा असा सल्लाच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

कोण आहेत अयोध्या पौळ?
आ. संतोष बांगर यांच्या आव्हानाला ओपन चॅलेंज दिल्याने अयोध्या पौळ या देखील चर्चेत आल्या आहेत. अयोध्या पौळ या सेना सोशल मीडियाच्या समन्वयक आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्यक्रम, संवाद हे देखील प्रसारित केले जातात.

‘माझ्या कानशिलात मारून दाखवा’
आ. संतोष बांगर यांनी गद्दार म्हणणा-यांच्या कानशिलात मारा असे म्हणताच त्यांचे आव्हान अयोध्या पौळ यांनी स्वीकारले आहे. एक वेळ नाही तर लाख वेळा आपण असेच म्हणणार. जीव गेला तरी चालेल पण आपल्या भूमिकेपासून माघार घेणार नसल्याचे पौळ यांनी सांगितले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या