27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्र‘वर्षा’वर बाप्पाचे आगमन; मुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब पूजा

‘वर्षा’वर बाप्पाचे आगमन; मुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब पूजा

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीही गणरायाचे उत्साहात आगमन झाले आहे.

राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीही गणरायाचे उत्साहात आगमन झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब बाप्पाची पूजा करत प्रतिष्ठापना केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांची सून आणि त्यांचा नातू रुद्रांश हे देखील सहभागी झाले होते.

मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सर्वांनी एकजुटीने राज्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या संदेशात मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या घराघरांत गणरायाचे आगमन होते आहे.

त्याच्या कृपेने दोन वर्षांपासून असलेले कोरोनाचे संकट अखेर दूर झाले. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत.
गणेशाचे हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गणरायाचा उत्सव करताना राज्याच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा आपण संकल्प करूया. आपण सर्व एकजुटीने कोणत्याही आव्हानाची पर्वा न करता प्रयत्न करूया.

उत्सव साजरा करताना सामाजिक भान जपणेही आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यावर सार्वजनिक गणेश मंडळांनी भर देऊन जागृती करण्याचे आवाहन मी सर्व गणेशभक्तांना करत आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने महाराष्ट्राच्या विकासाचा दृढसंकल्प आपण केला आहे. त्यासाठी आपल्या मनातले सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे मी आश्वासन देतो.

आपली साथ आम्हाला हवी आहे. कोरोना संकटामुळे मंदावलेली विकासाची गती आपल्याला पुन्हा गाठायची आहे. त्यासाठी कितीही आव्हानं आली तरी त्याची तमा बाळगायची नाही.
महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करण्याचा संकल्प पूर्णत्वास जावा, असे साकडे मी गणरायाला घालत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातल्या नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सर्व नागरिकांनी सामाजिक भान राखत उत्सव साजरा करण्याचे आवाहनही केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या