26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्र‘मिशन महाराष्ट्र’ अंतर्गत बारामती ...

‘मिशन महाराष्ट्र’ अंतर्गत बारामती …

एकमत ऑनलाईन

पुणे : आमचे मिशन भारत आहे. बारामती महाराष्ट्राच्या बाहेर नाही. मिशन महाराष्ट्र अंतर्गत बारामती आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. आजचा माझा दौरा राजकीय नाही. राजे उमाजी नाईक यांना मानवंदना देण्यासाठी जात आहे. रामोशी समाजासाठी आमचे सरकार नव्या योजना घेऊन येऊ इच्छित आहे. त्या पार्श्वभूमीवर संवाद साधण्यासाठी जात आहे, असे ते यावेळी म्हणाले.

भाजपाने बारामती जिंकण्यासाठी रणनीती आखली आहे. काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीचा दौरा केला होता. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यादेखील बारामती दौरा करणार आहेत. भाजपाच्या या मिशन बारामतीविषयी विचारले असता ते बोलत होते. प्रत्येक निवडणूक शेवटची समजून लढल्यास यश नक्की मिळते, असे ते म्हणाले होते.

चिन्ह गोठवण्याच्या मागणीविषयी बोलणे टाळले
शिवसेना-शिंदे गटाच्या वादावर सुप्रीम कोर्टात २७ सप्टेंबरला निर्णय होणार आहे. त्याविषयी ते म्हणाले, की सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत चिन्ह गोठवण्याची मागणी करण्यात आली आहे का, याबाबत मला माहिती नाही. तुम्ही मला सांगत आहात, त्यानंतरच हे समजले. सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत जबाबदारीने बोलले पाहिजे. मला या विषयाची माहिती नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

श्रीकांत शिंदेंच्या जागेवर आमचा दावा नाही
आमच्यासोबत ओरिजिनल शिवसेना आहे. शिंदे साहेबांची शिवसेना आमच्यासोबत आहे. त्यांचे जे लोक आमच्यासोबत आले आहेत, त्यांच्या जागेवर आम्ही कशाला दावा करणार, असा सवाल त्यांनी केला. उरलेली शिल्लक सेना असेल तर शिंदे साहेब, आम्ही ठरवू, कल्याण लोकसभेच्या जागेवरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजपा दावा करत असल्याच्या चर्चांवर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

पतंगबाजी करू नका
आगामी निवडणूक आणि जागावाटपाबाबत भाजपा आणि शिंदे गटाचा फॉर्म्युला ठरल्याबाबत ते म्हणाले, की आम्ही जागा किती लढवायच्या ते तुम्ही ठरवू नका, तुम्ही पतंगबाजी करू नका, आमचे हैदराबाद नाही तर मिशन मुंबई आहे, असेही ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या