24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रबारामती जिंकणार म्हणजे जिंकणारच

बारामती जिंकणार म्हणजे जिंकणारच

एकमत ऑनलाईन

बारामती : २०२४ च्या लोकसभेला महाराष्ट्रात ४५ प्लस आणि विधानसभेला २०० प्लस हे सूत्र आम्ही ठरवले असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. २०२४ ला आम्ही बारामतीसहित अनेक लोकसभा जिंकू. आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघात याआधी कधी फाईट झाली नाही, तशी फाईट होईल.

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र लढून बारामती लोकसभा जिंकणार म्हणजे जिंकणारच असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. बावनकुळे हे बारामती दौ-यावर आहेत. बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलत होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती मतदारसंघ जिंकण्याचा निर्धार केला आहे.

भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असून बारामती लोकसभा मतदारसंघात तगडी लढत देऊ असे बावनकुळे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरू आहेत. १५५ देशांनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. बाकी लोकांना पॉलिटिकल व्हिजन आहे. पंरतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाचे व्हिजन घेऊन चालले असल्याचे बावनकुळे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने गरीब कल्याणकारी योजनांना ब्रेक लावला होता, असेही बावनकुळे म्हणाले. पुढच्या काळात मी राज्याचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रात ४५ प्लस लोकसभा आणि २०० प्लस विधानसभा हे सूत्र आम्ही ठरवल्याचे बावनकुळेंनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या