25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रबीसीसीआय धोनीवर सोपवणार मोठी जबाबदारी?

बीसीसीआय धोनीवर सोपवणार मोठी जबाबदारी?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयसीसी टूर्नामेंटमध्ये वारंवार अपयश आल्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्ड आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. भारतीय संघात आता मोठे बदल दिसू शकतात. बीसीसीआय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला भारतीय क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी देऊ शकते. ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर बीसीसीआय भारतीय टी-२० क्रिकेट सेटअपसह मोठ्या भूमिकेसाठी एम. एस. धोनीशी संपर्क करत आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्ड धोनीला भारतीय क्रिकेटमध्ये कायमस्वरूपी भूमिकेसाठी बोलावण्याचा विचार केला आहे. धोनीला डॉयरेक्टर ऑफ क्रिकेट पदी नियुक्त केले जाऊ शकते. ‘द टेलिग्राफ’च्या अहवालानुसार, प्रशिक्षक राहुल द्रविडला तिन्ही फॉरमॅटचे

व्यवस्थापन करण्याचा भार खूप आहे त्यामुळे बीसीसीआय प्रशिक्षकपदाची भूमिका विभाजित करण्याचा विचार करत आहे. धोनीचा टी-२० फॉरमॅटमध्ये समावेश करून भारतीय क्रिकेट संघाचा स्तर उंचावण्याची जबाबदारी बोर्ड देऊ शकते. अहवालानुसार, या महिन्याच्या अखेरीस सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत या विषयावर चर्चा केली जाणार आहे.

एम. एस. धोनी यूएईमधील टी-२० विश्वचषक २०२१ दरम्यान संघासोबत काम केले पण तो अंतरिम भूमिकेत होता. जवळपास आठवडाभराचा सहभाग असूनही, निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही. भारतीय संघ सुरुवातीच्या फे-यांमध्ये बाद झाला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला पाकिस्तान आणि न्यूझिलंडकडून पराभव पत्करावा लागला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या