27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeखबरदार.. नियमांचे उल्लंघन कराल तर..

खबरदार.. नियमांचे उल्लंघन कराल तर..

महापालिका अधिकारी, कर्मचा-यांनंतर आयुक्तांचा मोर्चा व्यापा-यांकडे

एकमत ऑनलाईन

नांदेड : विशेष प्रतिनिधी
महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने सोमवारी महापालिकेतील कर्मचारी, अधिकाºयांना फैलावर घेत दंडात्मक कारवाई केली. तर मंगळवारी आयुक्तांनी आपला मोर्चा शहरातील व्यापा-यांकडे वळवला. सकाळपासूनच आयुक्त हे शहरात फेरफटका मारत होते. यावेळी अनेक व्यापाºयांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या सर्व व्यापा-यांवर त्यांनी दंडात्मक कारवाई करत यापुढे खबरदार.. नियमांचे उल्लंघन कराल तर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा व्यापाºयांना दिल्यामुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे.

Read More  शरद पवार यांनी राज्य सरकारला दिल्या 8 महत्त्वाच्या सूचना

गेल्या ५६ दिवसापासून लॉकडाऊ नमुळे शहरातील सर्वच प्रमुख दुकाने बंद ठेवण्यात आली होती. चौथ्या फेरीतील लॉकडाऊ नमुळे राज्य शासनाने नियमावली करुन देण्यापुर्वी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शहरातील कुठली दुकाने उघडी ठेवावीत व कुठली उघडी ठेवावीत यासंदर्भात अद्यादेश आढला होता. या आदेशाचे पालन न करता काही व्यापाºयांनी बिनदिक्कतपणे आपली दुकाने उघडली होती. महापालिका आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी महापालिकेतील अधिकारी, कर्मचाºयांचा फौजफाटा घेत शहरामध्ये फेरफटका मारला. त्यावेळी शिवाजीनगर येथील आपणा शिव बाजार, आराधना इलेक्ट्रीकल तारासिंह मार्केट, अशिष गारमेंट जुना मोंढा, देवाज कलेक्शन श्रीनगर, ई-स्पेस मोबाईल शॉपी, आयटीआय, नांदेड वाईन शॉप शिवाजीनगर या दुकानदारांनी लॉकडाऊनमध्ये उघडण्याबाबत दिलेल्या सवलतीचा गैरफायदा घेवून जिल्हाधिका-यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरुन या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Read More  विना वॅक्सीन ‘हे’ औषध थांबवेल COVID-19 ला

प्रत्येक दुकानदारास पाच हजार रुपये दंड थोटावण्यात आला. दिवसभरात एकूण ३0 हजार रुपये महापालिकेला प्राप्त झाले आहेत.२२ मे ते ३१ मे पर्यंत राज्य शासनाने विविध झोनमध्ये विविध नियम लागू केले आहेत. काय बंद असावे व काय सुरु असावे याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्टÑ सरकारने १७ मे रोजी पत्रक काढून लॉकडाऊ न चारची घोषणा केली. त्यानंतर ही नियमावली करण्यात आली. त्यानुसार पुन्हा एकदा जिल्हाधिका-यांना आता नांदेड शहरासाठी नियमावली करावी लागणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या