36.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeपरभणीजावयास सासरा व मेहुण्याकडून मारहाण

जावयास सासरा व मेहुण्याकडून मारहाण

एकमत ऑनलाईन

जिंतूर : तालुक्यातील वरुड नृसिंह येथे पत्नीला भेटण्यासाठी गेलेल्या जावयास मेहुणा आणि सास-याने मारहाण केल्याची घटना घडली असून जावाई लक्ष्मण कदम यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण बालासाहेब कदम (३५) यांनी फिर्यादीत नमूद केले की, पत्नी व मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी दि. ११ मे रोजी वरुड येथे गेले होते. त्या वेळी त्यांचे सासरे विष्णू ग्यानोजी सडाळ म्हणाले, माझ्या मुलीस नेहमीच का त्रास देता. तिला तुमच्यासोबत पाठवणार नाही. याच वादातून सासरा व मेहुणा कृष्णा विष्णू सडाळ यांनी शिवीगाळ केली. थापडबुक्क्याने व काठीने मारहाण केली. मुलीला घेण्यासाठी आलात तर जीवे मारू अशी धमकी दिली. त्यावरून जिंतूर पोलिस ठाण्यात कृष्णा विष्णू सडाळ व विष्णू ग्यानोजी सडाळ या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पो.कॉ. बंदुके करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या