Thursday, September 28, 2023

चोरीच्या संशयावरून मारहाण

एकाचा मृत्यू, दोघे गंभीर, परभणी जिल्ह्यातील घटना
परभणी : चोरीच्या उद्देशाने गावात आल्याच्या संशयावरून गावक-यांनी तीन संशयितांना जबर मारहाण केली. या मारहाणीत एका जणाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना परभणी तालुक्यातील उखळद येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

परभणी तालुक्यातील बलसा खुर्द येथील तिघे जण उखळद येथे गेले होते. हे तिघेही चोरीच्या उद्देशाने आल्याच्या संशयावरून त्यांना गावातील जमावाने जबर मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमीसह मृत तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, या घटनेमुळे गावात तणाव वाढला होता. तसेच चोरीच्या इराद्याने तरुण गावात आल्याच्या संशयावरून गावात दहशतही वाढली आहे.

या घटनेचे वृत्त समजताच पोलिस अधीक्षक रागसुधा आर., अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, ताडकळस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कपिल शेळके आदींनी जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या