उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील अवैध धंद्यावर बीड येथील विशेष पोलिस पथकाने धाडी टाकल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी ४० ते ५० जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शुक्रवारी दि. १३ मे रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
उस्मानाबाद शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यामध्ये काही पोलिसांचेही धंदे आहेत. पोलिस महासंचालक के.प्रसन्ना यांच्या आदेशानुसार बीड येथील सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिस पथकाने शुक्रवारी कारवाई केली. अवैध लॉटरी, मटका, चक्री जुगार, या धंद्यावर धाडी टाकून जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे तसेच ४० ते ५० जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईने अवैध धंदे करणा-याचे धाबे दणाणले आहेत. उस्मानाबाद पोलिस दलातही खळबळ माजली आहे.