32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeमहाराष्ट्रबीड: मराठा समन्वयक समितीकडून राज्यभर आंदोलन

बीड: मराठा समन्वयक समितीकडून राज्यभर आंदोलन

एकमत ऑनलाईन

बीड: शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांच्या आदेशावरून ठिकठिकाणी जागरण गोंधळ आंदोलन केले जात आहे. दरम्यान बीड येथे देखील शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी देखील काळ्या फिती, घोषणाबाजी कानी काळे कपडे घालून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. हे आंदोलन बीड शहराच्या पश्चिमेस असणाऱ्या चऱ्हाटा फाट्यावर आहे. या आंदोलनात संबळ, हलकी देखील वाजवण्यात आली आहे. या आंदोलनात मराठा समन्वयक समितीच्या वतीने आक्रोश केला गेला आहे. दरम्यान आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून ताब्यात देखील घेण्यात आल आहे. दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेत असताना आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली आहे.

मराठा समाजातील अनेक मागण्या प्रलंबित असून, या मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठा समन्वयक समितीच्य वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आज देखील औरंगाबाद येथील क्रांती चौकात मराठा समन्वयक समितीच्या वतीने जागरण गोंधळ करून, आंदोलन करण्यात आले आहे. क्रांती चौकात दुपारच्या वेळेत जागरण गोंधळ घालत सरकारला जागे करण्यासाठी हवन देखील करण्यात आले आहे. आंदोलना दरम्यान मराठा समन्वयकच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्य्त घेतलं आहे. यावेळी आंदोलक आक्रमक झाले असून, ते म्हणाले की, आम्ही हे आंदोलन मराठा समाजाच्या मागण्यांसाठी करत आहोत. मात्र हे आंदोलन सरकार तर्फे दडपले जात आहे. मात्र आम्ही सरकारच्या विरोधात देखील रस्त्यावर उतरू.

दरम्यान आंदोलक म्हणाले कि, मराठा समाजाच्या आरक्षण संधर्भात अशोक चव्हाण हे वेळकाढू पणा करत आहेत. समाजाच्या मागण्या देखील सरकार गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे सरकारचा निषेध आम्ही राज्यभर जागरण गोंधळ करून करणार आहोत. मराठा समाजाच्या मागण्याची तत्काळ सरकारने दखल घेवून, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. दरम्यान आम्ही आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार आहोत, अस देखील आंदोलक यावेळी म्हणाले.

दरम्यान २३ जुलै रोजी होणाऱ्या आंदोलनात कोपर्डी येथे घडलेल्या घटनेतील नराधमाना फाशीची शिक्षा व्हावी. तसेच सारथी संस्थेला सरकारने जास्तीत जास्त बजेट द्यावे. शिवस्मारकाचे काम लवकरात लवकर चालू करावे. मराठा समाजातील विध्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल करण्यात यावे अशी मागणी करण्यात येणार आहे.

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यासाठी गोदावरी नदीच्या पात्रात काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेऊन बलिदान दिले आहे. २३ जुलै गुरुवार रोजी या घटनेला २ वर्ष पूर्ण झाले . दरम्यान काकासाहेब शिंदे यांनी दिलेल्या बलीदानाच्या ठिकाणीच मराठी क्रांती मोर्च्याच्या वतीने आत्मबलिदान आंदोलन करण्यात येणार होत. मात्र पोलिसांनी आंदोलकांना आंदोलनाच्या स्थळापर्यंत जाऊ दिले नाही.

स्वातंत्र्यदिनानिमित्त एकलव्य स्कुलमध्ये कोरोना योध्दांचा सत्कार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या