21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeक्रीडाबीडच्या अविनाश साबळेला स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक

बीडच्या अविनाश साबळेला स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळे याने बर्मिंगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्य पदक भारताला मिळवून दिले आहे. त्याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:११:२० अशी वेळ नोंदवून रौप्य पदक जिंकले आहे. विशेष म्हणजे या पदकासह अवघ्या तासाभरात भारताने ट्रॅक अँड फिल्डमध्ये दुसरे पदक जिंकले आहे. काही वेळापूर्वीच प्रियांका गोस्वामीने १० किमी चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले होते. ज्यानंतर आता अविनाशनेही रौप्य जिंकले आहे.

अविनाश याने याआधीदेखील अनेक वेळा चमकदार कामगिरी केली आहे. पण यावेळची कॉमनवेल्थ स्पर्धा त्याच्यासाठी खूप खास होती. अविनाशने यावेळी आपली सर्वोत्तम कामगिरी करत ८ मिनिटे ११.२० सेकंद घेत शर्यत जिंकल्यामुळे एक नॅशनल रेकॉर्ड आणि स्वत:चा बेस्टही सेट केला आहे. काहीशा फरकाने तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला. या खेळात केनियाच्या अब्राहमने ८.११.१५ मिनिटे इतकी वेळ घेत सुवर्णपदक जिंकले. तर कांस्यपदकही केनियाच्या खेळाडूने जिंकले. आमोस सेरेमने याने ८.१६.८३ मिनिटांचा वेळ घेत कांस्यपदक जिंकले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या