18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeअटी व नियमावलीनुसार किराणा दुकानात मिळणार बीअर

अटी व नियमावलीनुसार किराणा दुकानात मिळणार बीअर

एकमत ऑनलाईन

मुंबई : काही दिवसांपूर्वी, उत्पादन शुल्क मंत्री आणि शिंदे गटाचे शंभुराजे देसाई यांनी राज्यातील मॉलमध्ये वाईनविक्री सुरू होणार असे संकेत दिले होते. मात्र, भाजपने त्याला विरोध दर्शवला. दरम्यान, देशातील एका राज्यात किराणा दुकानात बीअर विक्रीला परवानगी देण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये अधिकृत किराणा दुकानांमध्ये बीअर उपलब्ध होणार आहे. कश्मीरच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सोमवारी याबाबतच्या अर्जाला मान्यता दिली आहे. आता जम्मू-काश्मीरच्या शहरी भागातील अधिकृत डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये बीअर आणि इतर रेडी टू ड्रिंक प्रकारातील शीतपेये उपलब्ध होणार आहेत. मात्र, अशा प्रकारच्या स्टोअर्ससाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

जम्मू आणि श्रीनगरसाठी एखाद्या व्यावसायिक संकुलातील १२०० चौरस फूट जागेचा गाळा, वार्षिक पाच कोटी उत्पन्न अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. तर इतर शहरी भागासाठी २ कोटी इतकी अट ठेवण्यात आली आहे.

आता जम्मू-काश्मीरच्या शहरी भागातील अधिकृत डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये बीअर आणि इतर रेडी टू ड्रिंक प्रकारातील शीतपेये उपलब्ध होणार आहेत. मात्र, अशा प्रकारच्या स्टोअर्ससाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. जम्मू आणि श्रीनगरसाठी एखाद्या व्यावसायिक संकुलातील १२०० चौरस फूट जागेचा गाळा, वार्षिक पाच कोटी उत्पन्न अशा अटी ठेवण्यात आल्या आहेत. तर इतर शहरी भागासाठी २ कोटी इतकी अट ठेवण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या