26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रातील फटाकेविक्री बंदी मागे

उत्तर महाराष्ट्रातील फटाकेविक्री बंदी मागे

एकमत ऑनलाईन

नाशिक : दिवाळी जवळ आल्याने बहुतांश ठिकाणी फटाके विक्रेत्यांना परवाने देऊन विक्रीही सुरू झाली. निर्बंध शिथिल होत असल्याने दिवाळी उत्साहात साजरी करण्याकडे नागरिकांचा कल असताना नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या फटाकेबंदीच्या पत्रामुळे नवा धमाका झाला होता. मात्र आता उत्तर महाराष्ट्रातील फटाके विक्रेत्यांना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने हा तिढा अखेर सुटला आहे.

अखेर आता उत्तर महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांत फटाकेविक्री होणार आहे. महापालिका महासभेआधीच फटाकेविक्री बंदी मागे घेण्यात आली असून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मध्यस्थीने तिढा सुटल्याची माहिती मिळत आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ५ जिल्ह्यांना निर्देश दिले होते. मात्र,भुजबळ यांनी थेट प्रधान सचिव सीताराम कुंटे यांच्यासोबत संवाद साधल्याची माहिती मिळत आहे.

पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना बहुतांश निर्बंध खुले झाले आहेत. त्यामुळे सण-उत्सवांवरील निर्बंधही शिथिल होत आहेत. अशा परिस्थितीत यावर्षी दिवाळी उत्साहात साजरी होणार, या आशेवर नागरिक आहेत. त्यामुळे जर या पत्राची काटेकोर अंमलबजावणी झाली तर फटाकेप्रेमींचीही निराशा होणार होती. मात्र, पर्यावरणवादी नागरिकांकडून याचे स्वागत करण्यात आले होते. दिवाळीत फटाक्यांना बंदी घालण्याचा ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या. त्यामुळे नाशिक विभागात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे पेच निर्माण झाला होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या