27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeऔरंगाबादऔरंगाबादमध्ये युवकाकडून भंगारवाल्याचा खून

औरंगाबादमध्ये युवकाकडून भंगारवाल्याचा खून

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादला शुक्रवारी मध्यरात्री नेहरूनगर भागातील पाण्याच्या टाकीखाली किरकोळ कारणातून शिवीगाळ व खूनाचा प्रकार घडला. घटनेत १९ वर्षीय युवकाने ३६ वर्षीय व्यक्तीचा खून केला. साबेर शहा कासिम शहा असे मृताचे नाव असून खुनी फरहान खान निजाम खान फरार झाला आहे. साबेर शहाच्या आत्याचा मुलगा जावेद शहा बशीर शहा (३२, रा. राजूभाई याच्या तबेल्याजवळ, नेहरूनगर, औरंगाबाद) याने तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, शुक्रवारी रात्री जावेद रात्रीचे जेवण करून झोपण्यापूर्वी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कामानिमित्त पाण्याच्या टाकीकडे गेला होता.

या ठिकाणी दोघांमध्ये शिवीगाळ व वाद सुरु असल्याचे ऐकताच जावेदने जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला. जावेदने भांडण सोडवून साबेरला घरी नेण्यासाठी आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात दुस-या तरुणाने साबेरच्या पोटात चाकू खुपसला. यामुळे रक्तस्त्राव होऊन साबेर जागीच कोसळला. जावेद साबेरजवळ जात असताना फरहान (१९, रा. राजूभाई यांच्या तबेल्याजवळ, नेहरूनगर) पळून गेला.

जावेदने साबेरचे भाऊ आमेर व साजेदला बोलवून घेतले. तिघांनी मिळून साबेरला रिक्षातून तत्काळ घाटी रुग्णालयात नेले. मात्र, पहाटे साडेचारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. शनिवारी नेहरूनगर, कटकटगेट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. साबेरच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

फरहान नशेखोर?
साबेरच्या पोटात चाकू खुपसणारा फरहान खान निजाम खान हा तरुणही नशेखोर असल्याची चर्चा आहे. त्याला कधी दारू तर कधी नशेची बटनची गोळी खाण्याची सवय असल्याची चर्चा आहे. आधीपासूनचा वाद व नशेबाजीतून हा खून झाल्याची चर्चा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या