24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeमहाराष्ट्रपुण्यात मांजरीजवळ होणार भारत बायोटेकचा प्रकल्प

पुण्यात मांजरीजवळ होणार भारत बायोटेकचा प्रकल्प

एकमत ऑनलाईन

पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीची वाढती मागणी पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात भारत बायोटेक या कंपनीला प्रकल्प उभारण्यासाठी जागा शोधण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी मांजरी येथील एका जागेची पाहणी केली होती. गुरुवारी लगेचच जागेचा करार आणि हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देशमुख यांनी संबंधित अधिका-यांना दिले आहेत.

मांजरी येथे वन विभागाची ही जमीन असून, १९७३ मध्ये मर्क अ‍ॅण्ड को या कंपनीअंतर्गत असलेल्या इंटरवेट इंडिया प्रा. लि. (बायोवेट) या औषध निर्मिती कंपनीला ही जागा देण्यात आली होती. मात्र, ही कंपनी बंद पडल्यानंतर ही जागा मोकळी होती. या जागेवर प्रकल्प सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव भारत बायोटेक या कंपनीने राज्य सरकारकडे दिला होता. मात्र, त्यास प्रतिसाद न मिळाल्याने उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. न्यायालयाने सद्यस्थितीत कोरोना प्रतिबंधक लसींची आवश्यकता असल्याने या कंपनीला ही जागा देण्याचे आदेश दिले होते.

डिसेंबरपर्यंत २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या