21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeक्रीडाभवानी देवीला तलवारबाजीत सुवर्ण

भवानी देवीला तलवारबाजीत सुवर्ण

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : कॉमनवेल्थमध्ये तलवारबाजी स्पर्धेला ९ ऑगस्टपासून सुरूवात झाली असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताची आघाडीची तलवारबाज भवानी देवीने तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली.

तिने गेल्यावेळी देखील सुवर्ण पदक जिंकले होते. जागतिक क्रमवारीत ४२ व्या स्थानावर असलेल्या भारतीय तलवारबाज भवानी देवीने दुस-या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या व्हेरोनिका व्हेसिलेवाचा १५-१० असा पराभव केला. भवानी देवी ही ऑलिम्पिकमध्ये पात्र झालेली पहिली भारतीय तलवारबाज आहे. भवानी देवीने यंदाचा हंगाम इस्तंबुल येथील वर्ल्डकप पासून सुरू केला. मात्र तिला २३ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भवानी देवी कैरो येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दुस-या फेरीनंतर बाहेर पडली होती.

आता राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा ही तिची या वर्षातील १० वी स्पर्धा होती. दरम्यान, राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी भवानी देवी म्हणाली, अंतिम सामना खूप अवघड होता. मला भारतासाठी दुसरे सुवर्ण पदक जिंकल्याचा आनंद आहे. यंदाचे वर्ष माझ्यासाठी चांगले राहिले आहे. मला ही कामगिरी पुढेही सुरू ठेवायची आहे. मला भारतातून मिळणारा पाठिंबा मोठा आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या