यवतमाळ : शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे शिंदे गटामध्ये इन्कंिमग सुरूच आहे. आता खासदार भावना गवळी सुद्धा शिवसेनेला धक्का देण्याच्या तयारीत आहे. भावना गवळी गटातील ८ नगरसेवकांसह ३० पदाधिकारी शिंदे गटात सामील होणार आहे.
शिवसेनेतील नेत्यांच्या बंडाळीनंतर आता कार्यकर्ते सुद्धा शिंदे गटात सामील होत आहे. त्यात खासदार भावना गवळी यांचा गटाच्या ८ नगरसेवकांसह ३० पदाधिका-यांचा समावेश आहे. त्यामुळे आता शिवसेनेला हा पुन्हा ऐक धक्का मानला जात आहे.
भावना गवळी यांच्या जागी शिवसेना खासदार राजन विचारे हे शिवसेनेचे लोकसभेतील नवे प्रतोद असतील. मुख्य म्हणजे राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या मतदारसंघातूनच लोकसभेमध्ये निवडून गेले आहेत.
शिवसेनेने संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि राष्ट्रपतीपदाची निवडणूक तोंडावर असताना भावना गवळी यांची प्रतोदपदावरून हकालपट्टी केली आहे, त्यामुळे भावना गवळीही बंडाच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.