36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeमहाराष्ट्रभीमा कोरेगाव प्रकरण : स्टॅन स्वामी यांना अटक

भीमा कोरेगाव प्रकरण : स्टॅन स्वामी यांना अटक

एकमत ऑनलाईन

रांची : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सामाजिक कार्यकर्ते स्टॅन स्वामी (वय ८३) यांना झारखंडमधून अटक केली आहे. गुरुवारी रात्री स्टॅन स्वामी यांना त्यांच्या झारखंडमधील रांची येथे असलेल्या निवासस्थानाहून ताब्यात घेतले. दरम्यान, त्यांची जवळपास २० मिनिटे कसून चौकशी करण्यात आली. एनआयएच्या टीमने स्टेन स्वामी यांची जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात चौकशी केली होती.

तसंच त्यांना पुढील चौकशीसाठी मुंबईतील कार्यालयात बोलावले होते. परंतु वयोमानानुसार आणि कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर आपण प्रवास करू शकत नाही असे स्वामी यांनी सांगितले होते. झारखंड सरकारच्या निर्देशांनुसार ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरसिंग चौकशी करण्यात यावी असेही ते म्हणाले होते.

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलणार?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या