19 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeमहाराष्ट्रभुजबळ ख-या अर्थाने राष्ट्रवादी मधले ओवेसी

भुजबळ ख-या अर्थाने राष्ट्रवादी मधले ओवेसी

एकमत ऑनलाईन

मुंबई : छगन भुजबळ हे ख-या अर्थाने राष्ट्रवादी मधले ओवेसी आहेत. असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शाळेत सरस्वती देवीचे फोटो लावण्याबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे.

भुजबळ यांनी सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणा-या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असे विधान भुजबळ यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, भाजप नेते बावनकुळे यांनी निशाणा साधला आहे.

शिंदे फडणवीस सरकारने सर्वच धर्माच्या सणांना निर्बंध मुक्त केले, त्यामुळे गेल्या वीस वर्षात उत्साहाने हे सण साजरे झाले नाही, तेवढा उत्साह यंदा आहे. छगन भुजबळ यांचे जे वक्तव्य आले होते सरस्वती मातेच्या संदर्भामध्ये त्यावरुन असे वाटते की, भुजबळ हे ख-या अर्थाने राष्ट्रवादी मधले ओवेसी आहेत. असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

तसेच, पीएफआय सारख्या संघटनेवर बंदी आणणे म्हणजे भारताला वाचवणे आहे, या संघटनेने भारतामध्ये ज्या पद्धतीने आपले जाळे पसरून टारगेट करायचे अशा संघटनांना यापूर्वीच बंदी घालायला हवी होती, पण आता योग्य काम झालय, काँग्रेस सरकारच्या काळात या संघटना फोफावल्या, या संघटनेच्या लोकांना जिथे मिळेल तिथे झोडून काढले पाहिजे. अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी पीएफआय संघटनेवर दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या