24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीययोगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिर गाभा-याचे भूमिपूजन

योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिर गाभा-याचे भूमिपूजन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते अयोध्येत आज राम मंदिराच्या गाभा-याचे भूमिपूजन होत आहे. गाभा-याच्या पहिल्या शिळेचे मंत्रोच्चारासह योगींच्या हस्ते पूजन करण्यात आले.

या भूमिपूजनासह मंदिराच्या निर्मितीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. राम मंदिराच्या पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चबुत-याचे बांधकाम करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी आज हनुमान गढी येथे येऊन प्रथम दर्शन घेतले आणि मग राम मंदिर गाभा-याची पहिली शिळा ठेवली.

या गाभा-याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. तसेच २०२४ मधील मकरसंक्रांतीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची या गाभा-यात प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी राम मंदिराबाबतचा निकाल दिला. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या कामाचे भूमिपूजन केले होते.

त्यानंतर पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चबुत-याचे काम झाले आणि दुस-या टप्प्यात जवळपास दीड वर्षाने राम मंदिराच्या गाभा-याची पहिली शिळा ठेवली जात आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक असणार आहे. या पार्श्वभूमीवर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या