Sunday, September 24, 2023

5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरांचे भूमिपूजन

अगदी 100 ते 150 लोकांच्याच उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचे नियोजन

अयोध्या: देशातील अनेक वर्ष वादग्रस्त असणाऱ्या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता होणार असल्याचे दिसत आहे. कारण उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली आहे. येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचे भूमिपूजन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आता थेट संकल्पपूर्तीवेळीच मोदी अयोध्येत दिसणार

अयोध्येत राम मंदिराच्या कामासाठी शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. काल मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख आता निश्चित करण्यात आलीय. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. वाराणसी, केदारनाथसारख्या इतर मंदिरांना त्यांंनी अनेकदा भेट दिली. पण अयोध्येचा विषय न्यायप्रविष्ट होता. आता थेट संकल्पपूर्तीवेळीच मोदी अयोध्येत दिसणार आहेत.

मंदिर कशा पद्धतीने बांधले जाणार याचीही उत्सुकता

कोरोनाच्या काळात फार गर्दी होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्यात येत आहे. अगदी 100 ते 150 लोकांच्याच उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचे नियोजन आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हे देखील पाहणे महत्वाचे असेल. हे मंदिर कशा पद्धतीने बांधले जाणार याचीही उत्सुकता आहे. कालच्या ट्रस्टच्या बैठकीत त्यावरही चर्चा करण्यात आली.

Read More  भावी पिढ्यांसाठी वसा आणि वारसा

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या