24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रभुमरे हा तर गावठी मंत्री, मी त्याला सांभाळले

भुमरे हा तर गावठी मंत्री, मी त्याला सांभाळले

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्या गटातील आमदारांमध्ये संदीपान भुमरे यांचा सामावेश होता. त्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच आमदार खैरे यांच्या निशाण्यावर राहिले आहेत. भुमरे हा गावठी मंत्री असून त्याला काही कळत नाही असं वक्तव्य खैरे यांनी केले आहे.

रविवारी पैठण येथील एका स्थानिक कार्यक्रमात बोलताना संदीपान भुमरे यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शिवसेनेच्या एकूण आमदार आणि खासदारांपैकी जास्तीत जास्त आमदार, खासदार आमच्या कडे आहेत. मग तुम्हीच सांगा खरी शिवसेना कुणाची? असे म्हणत पक्षाचे चिन्हही लवकरच आम्हाला मिळेल असेही ते बोलताना म्हणाले होते.

दरम्यान, मंत्री भुमरे यांनी केलेल्या दाव्यावर उत्तर देताना खैरे म्हणाले की, संदीपान भुमरे हा तर गावठी मंत्री आहे, त्याला काही कळत नाही, तो काहीही बोलतो, त्याचा अभ्यास अजिबात नाही , मंत्रिपद कसे चालवायचे हेही त्याला कळत नाही, मी सुरूवातीपासून त्यांना सांभाळले आहे.

नशीबाने ते आमदार झाले आहेत. त्यामुळे आमच्या संपर्कात दोन आमदार आहेत असं बोलणं चुकीचं आहे. उलट शिंदे गटातीलच १० ते १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत. अशा शब्दांत खैरे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर टीका केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या