27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeक्रीडाशरद पवारांना मोठा धक्का!;महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

शरद पवारांना मोठा धक्का!;महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेने नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला आहे. आगामी दिवसांमध्ये अ‍ॅड हॉक समितीची निवड करण्यात येणार असून हीच समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निवडणूकसह इतर बाबींवर लक्ष देणार आहे.

याप्रसंगी भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर य्म्हणाले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्याकडून आम्हाला म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. आम्ही १५ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार सांगितला. तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते, असे ते स्पष्टपणे म्हणाले.

तक्रारींची दखल
विनोद तोमर पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत ब-याच तक्रारी आमच्याकडे येत होत्या. जिल्हा संघटना व खेळाडूंनीही आमच्याकडे त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. आमच्याकडून त्यांना संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता, पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर या सर्व तक्रारींची दखल घेत आम्ही त्यांच्यावर कारवाई केली, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

तोडगा काढू : सर्जेराव शिंदे
काही गैरसमज झाले असतील. ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी भारतीय कुस्ती संघटनेच्या पदाधिका-यांची आम्ही भेट घेणार आहोत. या प्रकरणावर तोडगा काढू,असे राज्य कुस्तीगीर सघटनेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे सकाळशी बोलताना म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या